केरळमध्‍ये एक, आसाम दोन तर पश्चिम बंगालमध्‍ये सहा टप्प्यांत

0
8
वृत्तसंस्था 
नवी दिल्ली – पश्चिम बंगाल, तमीळनाडू, केरळ आणि आसामशिवाय केंद्रशासित प्रदेश असलेल्‍या पुडुचेरीमध्‍ये यावर्षी निवडणूक होणार आहे. मुख्‍य निवडणूक आयुक्‍त नसीम जैदी यांनी या संदर्भात आज (शुक्रवारी) घोषणा केली असून, 19 मे रोजी मतमोजणी होणार आहे. या सर्व राज्‍यांतील विधानसभेचा कार्यकाळ 22 मे ते 5 जूनदरम्‍यान संपत आहे.
 
केरळ : 16 मे रोजी एका टप्प्यामध्ये मतदान.
पुडूचेरीमध्ये एकाच टप्प्यात 16 मे रोजी मतदान होणार
तामिळनाडूमध्येही एकाच टप्प्यात 16 मे रोजी मतदान होणार.
 
पश्चिम बंगालचे सहा टप्‍प्‍यांत मतदान
> 4 एप्रिलला पहिल्‍या तर 11 आणि 17 एप्रिलला दुसऱ्या टप्‍प्‍याचे मतदान
> 21 एप्रिलला तिसरा टप्‍पा.
> 25 एप्रिलला चौथ्या टप्प्याचे आणि 30 एप्रिलला पाच टप्प्यांचे मतदान होणार.
> 5 मे रोजी अंतिम टप्‍पा
 
आसाम
> आसाममध्ये दोन टप्प्यांमध्ये विधानसभा निवडणुकीसाठी मतदान होणार
> पहिल्या टप्प्यामध्ये ६५ जागांसाठी दुसऱ्या तर टप्प्यामध्ये 61 जागांसाठी मतदान
> 4 एप्रिलला पहिल्या टप्प्याचे, 11 एप्रिलला दुसऱ्या टप्प्याचे मतदान होणार.
 
मेच्‍या आत प्रक्रिया पूर्ण 

> मेच्‍या दुसऱ्या आठवड्यापर्यंत निवडणूक आयोगाला प्रक्रिया पूर्ण करायची आहे.
> या पाचही राज्‍यातील शालेय परीक्षा एप्रिलच्‍या शेवटपर्यंत समाप्‍त होणार आहे.
> या शिवाय तमीळनाडूमध्‍ये नवीन वर्ष, आसममध्‍ये बिहू आणि केरळमध्‍ये विशू हे मोठे धार्मिक उत्‍सव आहेत.
> या सर्व बाजू लक्षात मेच्‍या दुसऱ्या आठवड्यापर्यंत पक्रिया समाप्‍त होईल.