कन्हैया म्हणाला- भारतापासून नव्हे भारतात स्वातंत्र्य हवे

0
9
नवी दिल्ली – देशद्राेहाचा आरोप असलेला आणि जेएनयू विद्यार्थी संघटनेचा अध्यक्ष कन्हैयाकुमार गुरुवारी ६ महिन्यांच्या अंतरिम जामिनावर तिहार तुरुंगातून सुटला. जेएनयू परिसरात बोलताना त्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजप, संघावर हल्लाबोल केला.
 
कन्हैया म्हणाला, मोदी अाज भाषण देत होते. त्यांनी स्टॅलिन, ख्रुश्चेव्ह यांचा उल्लेख केला. तेव्हा वाटले की, टीव्हीत घुसावे. त्यांचा सूट पकडून सांगावे वाटले की, हिटलवरही बोला. आमच्यावर देशद्रोहाचे आरोप लावण्यात आले. आम्हाला देशापासून नव्हे, तर देशातच स्वातंत्र्य हवे. भारतापासून नव्हे, भुकेपासून स्वातंत्र्य हवे. देशाला संघ, असमानता, सरंजामशाही, जातिवाद, शोषणापासून मुक्ती हवी. खोटे टि्वट करणाऱ्या संघाच्या लोकांपासून आम्हाला मुक्ती हवी. जेएनयू विसरणे शक्य नाही. या देशात सत्तेने अत्याचार केले तेव्हा तेव्हा जेएनयूतून बुलंद आवाज आला. मोदीजी मन की बात करतात. त्यांच्या आईने त्यांच्याशी केलेला एखादा संवाद त्यांनी सांगावा.
तुरुंगात दोन वाट्या होत्या, निळी, लाल. बदल या दोन्ही रंगांमधूनच. थाळीत मला भारत दिसत होता आणि दोन वाट्यांमध्ये एकीत क्रांती, तर दुसरीत बाबासाहेबांच्या सामाजिक समरसता आंदोलनाची झलक होती. जेएनयूवरील हल्ला नियोजित होता, संघाने बहुदा पूर्वतयारी केली होती. ऑर्गनायझरमध्ये प्रथम लेख प्रसिद्ध झाला. नंतर सुब्रमण्यम स्वामी म्हणाले, जेएनयू बंद करा. मी म्हणतो की, चर्चेसाठी स्वामींना बोलवा. ते जिंकले, तर मी त्यांच्याबरोबर.