आज रेल्वेचा मेगा ब्लॉक

0
13

नागपूर दि.04:दक्षिण पूर्व मध्य रेल्वे अंतर्गत आज मेगा ब्लॉक घेण्यात येत असल्याने  नागपूरच्या दोन रेल्वे गाड्यांना रेल्वेस्थानकावर थांबविण्यात येणार आहे. तसेच पाच रेल्वे गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत.प्राप्त  माहितीनुसार दक्षिण पूर्व मध्य रेल्वेच्या दुर्ग-गोंदिया-कळमना उप लाईन सेक्शनमध्ये रेल्वे रुळाच्या कामाकरिता ४ मार्चला रात्री ८.४० वाजेपासून ४ तासांचा मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे. या कालावधीत रेल्वे वाहतूक काही काळाकरिता विस्कळीत होईल. ४ मार्चला गेवडा रोड ते नागपूरला येणारी शिवनाथ एक्स्प्रेस १ तास आणि टाटानगर ते इतवारी पॅसेंजर ३० मिनिटे दुर्ग रेल्वे स्थानकावर थांबविण्यात येणार आहे. याशिवाय ४ मार्चला रायपुर डोंगरगड मेमू, पाच मार्चला गोंदिया-रायपुर लोकल आणि डोंगरगड-रायपुर लोकल रद्द करण्यात आल्या आहेत. रेल्वे प्रशासनाने प्रवाशांना होणाऱ्या त्रासाबद्दल दिलगिरी व्यक्त केली आहे.