नक्षलवाद्यांशी चकमक; 2 जवान हुतात्मा

0
12

वृत्तसंस्था

रायपूर, दि. 4- सुरक्षा रक्षक आणि नक्षलवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत केंद्रीय राखीव पोलिस दलाचे (सीआरपीएफ) दोन जवान हुतात्मा झाले असून इतर 14 जण जखमी झाले आहेत. 

सुकमा जिल्ह्यातील बस्तर परिसरात दब्बानरका येथे गुरुवारी दुपारी साडे बाराच्या गस्तीवर असलेल्या पथकावर नक्षलवाद्यांनी हल्ला केल्याने चकमक सुरू झाली. ती चकमक रात्री उशिरापर्यंत सुरू होती. दरम्यान दोन जवान हुतात्मा झाले आहेत. सीआरपीएफ, स्थानिक पोलिसांनी संयुक्त नक्षलवाद्यांविरूद्ध संयुक्त मोहिम उघडली आहे. जखमींना रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या चकमकीबाबत अद्याप सविस्तर माहिती प्राप्त झालेली नाही.