‘कॉंग्रेसविरुद्ध काही करायचे तर उघडपणे करेल’

0
6

वृत्तसंस्था

हरिद्वार (उत्तराखंड) – उत्तराखंडमध्ये सुरु असलेल्या राजकारणामध्ये आपला काहीही सहभाग नसल्याचे म्हणत आपल्याला जर कॉंग्रेसविरुद्ध काही करायचे असेल तर आपण ते उघडपणे करू अशा प्रतिक्रिया रामदेवबाबांनी दिल्या आहेत. उत्तराखंडमधील कॉंग्रेस सरकार अस्थिर करण्यामागे रामदेवबाबा आणि भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष अमित शहा यांचा हात असल्याचा आरोप कॉंग्रेसचे नेते किशोर उपाध्याय यांनी केला होता. यावर बोलताना रामदेवबाबा म्हणाले, ‘सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांनी उत्तराखंडमधील कॉंग्रेसची स्थिती नियंत्रणात आणावी. मी कोणाच्याही मदतीने काहीही केलेले नाही, हे मी यापूर्वीच स्पष्ट केले आहे. जर मला कॉंग्रेसच्याविरुद्ध काही करायचे असेल तर ते मी उघडपणे करेल‘ तसेच “काहीही असो मी राजकारणातून बाहेर पडलो आहे. कॉंग्रेसने समंजसपणे वागावे. त्यांनी विनाकारण मला डिवचू नये आणि माझ्यावर खोटे आरोप करू नयेत‘, असा इशाराही रामदेवबाबांनी देण्यास विसरले नाहीत.