‘गुगल मॅप’वर जेएनयू ठरले ‘अँटी नॅशनल’!

0
15

नवी दिल्ली(वृत्तसंस्था) – ‘गुगल मॅप‘ वर आज ‘anti national‘, ‘sedition‘ किंवा ‘leftist‘ असा शोध घेण्याचा प्रयत्न केला तर जवाहरलाल नेहरू विद्यापीठ (जेएनयू) दर्शविण्यात येत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. 

संपूर्ण जगाचा नकाशा आणि त्यातील प्रमुख रस्ते, ठिकाणे इत्यादी माहिती दाखविणारी ‘गुगल मॅप‘ ही ‘गुगल‘ची सेवा आहे. गुगल मॅपवर जगभरातील कोणत्याही स्थळाचे नाव टाईप केल्यावर ते ठिकाण नकाशावर दाखविण्यात येते. मात्र आज शोध घेताना ‘anti national‘, ‘sedition‘ किंवा ‘leftist‘ असा शब्द टाईप केला तर जवाहरलाल नेहरू विद्यापीठ दर्शविण्यात येत आहे. हा प्रकार चुकून झाले आहे की हॅकरने केले आहे, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.