स्वच्छतेसाठी गंगा चे चक्क मुख्यमंत्र्यांना साकळे

0
5

वृत्तसंस्था

राजनांदगाव (छत्तीसगढ) – लगतच्या छत्तीसगढमधील राजनांदगाव जिल्ह्यातील गंगा साहू या ‘दिव्यांग‘ मुलीने आपल्या होणाऱ्या सासरी शौचालय उपलब्ध नसल्याने तिने  चक्क मुख्यमंत्री डॉ.रमन सिंह यांनाच पत्र  लिहून साकले घातले आहे. 

राजनांदगांव येथील महरूम गावातील निवासी विदेशीराम साहू यांची कन्या गंगा हीचा विवाह डौडीलोहारा विकासखंड येथील खैरकट्टा गावात विवाह निश्‍चित करण्यात आला आहे. येत्या 22 एप्रिल रोजी शिवन कुमार याच्याशी गंगाचा विवाह होणार आहे. मात्र गंगाला आपल्या होणाऱ्या सासरी शौचालयाची व्यवस्था नसल्याचे समजले. त्यामुळे तिने छत्तीसगढचे मुख्यमंत्री आणि खासदार अभिषेक सिंह यांना पत्र लिहून शौचालय उभारण्याची विनंती केली. मुख्यमंत्र्यांनीही गंगाच्या प्रयत्नांचे कौतुक करत अनुकूल प्रतिसाद दिला असून तातडीने शौचालय उभारण्याचे निर्देश दिले आहेत. शौचालय उभारून मुख्यमंत्री कार्यालयाला त्याबाबत कळवावे असे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत. तसेच मुख्यमंत्री कन्या विवाह योजनेंतर्गत गंगाला 30 हजार रुपयांची आर्थिक मदत जाहीर केली आहे.