अरविंद केजरीवाल यांच्यावर बूट फेकण्याचा प्रयत्न

0
7

नवी दिल्ली, दि. ९ – दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यावर बुट फेकून हल्ला करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. अरविंद केजरीवाल यांची सम-विषम फॉर्म्युलावर पत्रकार परिषद सुरु असताना हा प्रकार घडला. एका तरुणाने हा बूट फेकला मात्र त्यामागचे नेमके कारण अजून कळू शकलेलं नाही. तरुणाला लोकांनी पकडून पत्रकार परिषदेतून बाहेर नेले.