कन्फर्म रेल्वे तिकिटाचे ट्रान्सफर शक्य

0
8
वृत्तसंस्था
मुंबई, दि. ८ – लांब पल्ल्याच्या रेल्वे प्रवासात एखाद्या व्यक्तीचे तिकीट कर्न्फम झाल्यानंतर त्या व्यक्तीला काही कारणाने प्रवास करत आला नाही तर, ते तिकीट वाया जात होते. पण आता रेल्वे मंत्रालयाने नियमांमध्ये काही बदल केले आहेत. त्यामुळे कर्न्फम तिकीट असलेल्या व्यक्तीला प्रवास करता येणार नसेल तर २४ तास आधी त्या व्यकीचे तिकीट दुस-या व्यक्तीच्या नावावर ट्रान्सफर होऊ  शकते.
कर्न्फम रेल्वे तिकीट आता तुमच्या रक्तातातील नात्याच्या दुस-या व्यक्तीच्या नावावर ट्रान्सफर होऊ शकते. सरकारी कर्मचारी कर्न्फम तिकीट दुस-या सरकारी कर्मचा-याच्या नावावर ट्रान्सफर करु शकतो.  
१) रेल्वे प्रशासनाने महत्वाच्या स्थानकांवरील मुख्य रिझर्व्हेशन सुपरवायझर्सना कर्न्फम तिकीटावरील प्रवाशांचे नाव बदलण्याची परवानगी दिली आहे.
२) प्रवासी सरकारी कर्मचारी असेल तर, ट्रेन सुटायच्या नियोजित वेळेआधी म्हणजे २४ तास आधी त्याला दुस-याच्या नावावर तिकीट बदलण्यासाठी लिखित अर्ज करावा लागेल.
३) ट्रेन सुटायच्या २४ तास आधी कर्न्फम तिकीटावर दुस-याचे नाव चढवण्यासाठी लिखित अर्जाव्दारे विनंती करावी लागेल. कुटुंबातील दुस-या सदस्याच्या उदहारणार्थ आई, वडील, भाऊ, बहिण, मुलगा, मुलगी, पती आणि पत्नी यांचे नाव तिकीटावर टाकता येईल.
४)  मान्यताप्राप्त शैक्षणिक संस्थेचे विद्यार्थी प्रवासी असतील तर, त्या शैक्षणिक संस्थेच्या प्रमुखाला ४८ तास आधी कर्न्फम तिकीटावर दुस-याचे नाव टाकण्यासाठी अर्ज करावा लागेल. विद्यार्थ्यांना कर्न्फम तिकीट दुस-या विद्यार्थ्याच्या नावावर ट्रान्सफर करता येईल.