बस कोसळून 14 जणांचा मृत्यू

0
10
वृत्तसंस्था
शिमला – हिमाचल प्रदेशातील मंडी जिल्ह्यातील शनिवारी रात्री प्रवासी बस दरीत कोसळून झालेल्या भीषण अपघातात 14 जणांचा मृत्यू झाला. तर, 41 जण जखमी आहेत.
 
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हिमाचल प्रदेश प्रादेशिक परिवहन मंडळाची ही बस धर्मशाळाहून किन्नोर जिल्ह्यातील पेकाँग पिओ येथे चालली होती. बसमध्ये एकूण 55 प्रवासी होते. शिमलापासून 200 किमी अंतरावर असलेल्या जोगींद्रनगर येथील दरीत ही बस चालकाचे नियंत्रण सुटल्याने कोसळली. रस्त्याची स्थिती खराब असल्याने बसला अपघात झाल्याची शक्यता आहे.