वडसा-गडचिरोली लोहमार्गाचे भूमिपूजन ऑगस्ट महिन्यात : खा.नेते

0
7

गडचिरोली,-: प्रस्तावित वडसा-गडचिरोली लोहमार्गासाठी केंद्र सरकारबरोबरच राज्यसरकारनेही निधी दिला असून, येत्या ऑगस्ट महिन्यात त्याचे भूमिपूजन होणार असल्याची माहिती खा. अशोक नेते यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.

केंद्र सरकारने वडसा-गडचिरोली लोहमार्गाचा प्रस्ताव फेटाळल्यासंबंधीचे वृत्त एका वृत्तपत्रात प्रकाशित होताच आज खा. अशोक नेते यांनी तातडीची पत्रकार परिषद घेऊन खुलासा केला. ते म्हणाले, पूर्वी असलेली वडसा-गडचिरोली लोहमार्गाची ४९.५ किलोमीटरची लांबी वाढविण्यात आली असून, ती आता ५२.२ किलोमीटर करण्यात आली आहे. आपण पाठपुरावा केल्यानेच या लोहमार्गाला मंजुरी मिळाली असून, १६१ कोटीचा निधीही खेचून आणला आहे. जमीन अधिग्रहणाचे काम प्रगतिपथावर असून, ऑगस्ट महिन्यात त्याचे भूमिपूजन होणार आहे.पत्रकार परिषदेला भाजप नेते डॉ.भारत खटी, गजानन यनगंधलवार, प्रमोद पिपरे, रमेश भुरसे, रवींद्र ओल्लालवार, अनिल पोहनकर, अविनाश महाजन, प्रशांत भृगूवार, अनिल कुनघाडकर व अन्य कार्यकर्ते उपस्थित होते.