राज्यसभेतून 50 पेक्षा जास्त सदस्य निवृत्त

0
7
नवी दिल्ली, दि. १३ – संसदेचे वरिष्ठ सभागृह असलेल्या राज्यसभेतून आज ५३ खासदार निवृत्त होत आहेत. राज्यसभेतून निवृत्त होणा-या खासदारांचा सर्वाधिक फटका काँग्रेसला बसणार आहे. काँग्रेसचे ६५ खासदार असून, त्यातील १६ सदस्य निवृत्त होत आहेत. काँग्रेसच्या निवृत्त होणा-या सदस्यांमधून फारच कमी खासदार पुन्हा राज्यसभेवर येण्याची शक्यता आहे.
भाजपचे केंद्रात मंत्री असलेले व्यंकय्या नायडू, पियुष गोएल, निर्मला सितारामन, मुख्तार अब्बास नक्वी आणि वायएस चौधरी निवृत्त होत असून, त्यांची पुन्हा राज्यसभेवर निवड होईल. भाजपची राज्यसभेतील सदस्य संख्या वाढणार असली तरी, त्यांना पूर्ण बहुमत मिळवता येणार नाही.
30 जून रोजी राज्यसभेचे एक तृतियांश सदस्य निवृत्त होत आहेत. या सदस्यांचा कार्यकाळ 6 वर्षांचा असतो. दर दोन वर्षांनी एक तृतियांश सदस्य निवृत्त होत असता.  नव्या सदस्यांसाठी निवडणूक 11 जून रोजी होणार आहे.