‘काश्‍मीरचा कारभार चालतो संघाच्या मुख्यालयातून’

0
8

वृत्तसंस्था
श्रीनगर- जम्मू-काश्‍मीरमध्ये विविध आरोपांखाली पकडण्यात आलेल्या 22 आरोपींना नागपूरमधून दूरध्वनी आल्यानंतर सोडण्यात आले असून, काश्‍मीरचा कारभार स्वयंसेवक संघाच्या मुख्यालयातून चालतो, असा आरोप जम्मू-काश्‍मीरचे माजी मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी केला आहे.

अनंतनाग येथे आयोजित करण्यात आलेल्या रॅलीदरम्यान बोलताना अब्दुल्ला म्हणाले, ‘जम्मू-काश्‍मीरच्या मुख्यमंत्री मेहबुबा मुफ्ती या कटपुतलीसारख्या काम करत आहेत. नागपूर येथून संघाच्या मुख्यालयातून मुफ्ती यांना आदेश दिले जातात. संसदेमध्ये 22 आरोपींविरोधात कारवाई करू असे सांगण्यात आले होते. परंतु, या आरोपींना सोडून देण्याबरोबरच त्यांच्यावरील आरोपही काढण्यात आले.‘