आदिवासी विकास महामंडळाचा २१ हजार क्विटल धानाची चोरी

0
12

गडचिरोली,दि.17-आदिवासी विकास महामंडळ नाशिक अतंर्गत येणार्या गडचिरोली प्रादेशिक कार्यालया अंतर्गत धानोरा,कुरखेडा,कोरची आरमोरी आणी घोट असे पाच उपप्रादेशिक कार्यालय आहेत.येथील सुमारे 21 हजार क्विंटल धानच चोरीला गेल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. नक्षलग्रस्त मानल्या जाणाऱ्या धानोरा उपप्रादेशिक कार्यालया अंतर्गत सावरगाव येथे २०१४-१५ च्या हंगामात शेतकऱ्यांकडून २१ हजार १०४. ३८ हजार क्विंटल धान सावरगाव केंद्रावर खरेदी केला होता.सावरगाव खरेदी केंद्रात खरेदी केलेला धान ठेवण्यासाठी गोडाऊन नसल्याने तो धान उघड्यावरच होता.विशेष म्हणजे सावरगाव हा अति नक्षल प्रभावित भाग असल्याने तसेच रस्ते खराब झाले असल्याने येथील धानाची उचल करण्यात आली नव्हती. उघड्यावर असलेल्या या लाखो रुपयाचा धानाची सुरक्षा करण्यासाठी केंद्र व्यवस्थापक म्हणून एस एस कुमरे नामक एका व्यक्तीची नियुक्ती करण्यात आली होती.त्यानंतरही मात्र इतक्या मोठ्या प्रमाणात धान चोरी कसे गेले असा प्रश्न उपस्थित केल्या जात आहे.