संसदेचे पावसाळी अधिवेशन 18 जुलैपासून होणार

0
13

नवी दिल्ली,दि.29- संसदेचे पावसाळी अधिवेशन 18 जुलै ते 12 ऑगस्ट यादरम्यान घेण्यात येणार आहे, असे संसंदीय कामकाज मंत्री एम. वैंकय्या नायडू यांनी आज (बुधवार) जाहीर केले.

उत्तर प्रदेश निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर होणाऱ्या या अधिवशेनामध्ये वस्तू व सेवा कर (GST) विधेयक, अणू पुरवठादार गटाचे (NSG) सदस्यत्व मिळविण्यात भारताला आलेले अपयश, तसेच दिल्लीतील आप आणि भाजपमधील राजकारण यावरून सरकारला विरोधकांना सामोरे जावे लागेल.

संसदीय कामकाजासंदर्भात मंत्रिमंडळ समितीच्या वतीने केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंह यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आलेल्या बैठकीमध्ये अधिवेशनाचा कालावधी निश्चित करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
“पावसाळी अधिवेश 18 जुलै रोजी सुरू होईल… अधिवेशनात 20 दिवस कामकाज चालेल,” असे नायडू यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.