मॉरिसच्या अधीक्षिकेची बदली करा-उपजिल्हाधिकार्यांना निवेदन

0
11

नागपूर,दि.29- वसंतराव नाईक शासकीय कला व समाज विज्ञान महाविद्यालयाच्या अधीक्षक शैलजा नाफडे या मानसिक छळ करतात. भेटायला येणाऱ्या पालकांना त्रास देतात, अशी तक्रार महाविद्यालयाच्या वसतिगृहात राहणाऱ्या विद्यार्थिनींनी निवासी उपजिल्हाधिकारी रविद्रं कुंभारे यांच्याकडे केली. तसेच त्यांची त्वरित बदली करण्याचीही मागणी केली.

वसंतराव नाईक शासकीय कला व समाज विज्ञान महाविद्यालयाच्या शासकीय वसतिगृहात विदर्भातील 80 मुली वास्तव्यास आहेत. अधीक्षिका नाफडे त्यांना जातीवाचक शिवीगाळ करतात. भेदभाव करतात. समस्या असल्यास ऐकून घेण्याऐवजी धुडाकावून लावतात. संचालकाकडे तक्रार केल्यास वसतिगृहातून काढण्याची तसेच महाविद्यालयातील प्रवेश रद्द करण्याची धमकी देतात. वसतिगृहात निकृष्ट दर्जाचे जेवण दिले जाते. मुलींना वसतिगृहात ओळखपत्र दिले नाही. विचारणा केल्यास रेकॉर्ड खराब करण्याची धमकी देतात. अधिक्षिकेच्या विरोधात बोलल्यास परीक्षेचे रोल नंबर विचारले जातात. सततच्या भांडणामुळे मुलींच्या अभ्यासावर परिणाम होत असल्यामुळे समितीकडे तक्रार केली. समितीने शैलजा नाफडे यांना समजविण्याचे काम केले. मात्र, कुठल्याही प्रकारची कारवाई केली नाही. यामुळे अधिक्षिकेची बदली करण्यात यावी, असे निवेदन विद्यार्थिनींनी निवासी उपजिल्हाधिकारी यांना दिले.