भाजप आणि आरएसएसचा आरक्षण संपविण्याचा डाव – मायावती

0
13

वृत्तसंस्था
आग्रा, दि. २१ : भाजपशासित राज्यात दलितांवरील हल्यांत वाढ झाली आहे. भाजपा आणि आरएसएसचा आरक्षण संपविण्याचा डाव आहे अशी टीका मयावती यांनी आग्रा येथिल रॅली दरम्यान केली. या रॅलीमार्फत त्यांनी उत्तरप्रदेश मधील प्राचाराचा नारळ फोडला आहे. पुढील वर्षी उत्तरप्रदेशमधील मतदान होणार आहे. बिहारप्रमाणेच उत्तरप्रदेशमध्ये देखिल जातीयवादावर निवडणूक होणार का? असा प्रश्न जनतेतून विचारला जात आहे.
पुढे बोलताना म्हणाल्या, भाजपाप्रमाणे काँग्रेस देखील अरक्षण संपवण्याचे प्रयत्न करत आहे. काँग्रेस आणि भाजपा एकसारखेच आहे. फक्त यांच्या जागा बदलल्या आहेत. भाजपा आणि काँग्रेसने दलीतविरोद्दी एक फळीच तयार केली आहे.

मायावती यांनी मादी यांच्यावर घणघोर टीका केली. त्या म्हणाल्या. अपयश झाकण्यासाठी बलुचिस्तानचा मुद्दा पुढे आणला गेला आहे. मोठ्या उद्योगपतींची कर्जे माफ करणे हेच केंद्रातील सरकारचे काम आहे. सर्वांना मोफत घरे देणार, भ्रष्टाचार संपवणार अशी अनेक अश्वासने निवडणूकीला दिली होती. पण केंद्रातील सत्तेत आल्यानंतर भाजपने एकही आश्वासन पाळले नाही. देशातील व्यापाऱ्यांवर, शेतकऱ्यांवर उपासमारीची वेळ आली आहे, देशात अच्छे दिन आलेच नाहीत. पण उत्तर प्रदेशात बसपाचे सरकार येणार आणि येथिल लोकंना अच्छे दिन पहायला मिळणार असा विश्वास मायावतींनी व्यक्त केला.