वामन जयंतीच्या शुभेच्छा देऊन राजा महाबलीचा अवमान

0
10

वृत्तसंस्था

नवी दिल्ली- केरळमध्ये ओणममुळे उत्साहाचे वातावरण असताना आज (बुधवार) भारतीय जनता पक्षाचे (भाजप) अध्यक्ष अमित शहा यांनी केरळवासीयांना ओणमसणासोबतच वामन जयंतीच्याही शुभेच्छा दिल्याने त्यांना अन्य राजकीय पक्षांच्या रोषास सामोरे जावे लागत आहे.
केरळमध्ये ओणम हा सण राजा महाबलीच्या सन्मानार्थ साजरा केला जातो; पण अमित शहा यांनी आपल्या ट्‌विटच्या माध्यमातून वामनाचे उदात्तीकरण केल्याने नवा वाद निर्माण झाला आहे. अमित शहा यांनी वामन जयंतीच्या शुभेच्छा देऊन राजा महाबलीस मानणाऱ्या जनतेचा अवमान केला आहे. हा केरळच्या लोकांचा अवमान असल्याचे विजयन यांनी म्हटले आहे. 


केरळचे मुख्यमंत्री पी. विजयन यांनी शहांनी इतिहासाचे विकृतीकरण केल्याचा आरोप करत त्यांच्या माफीची मागणी केली आहे. ओणममुळे आज शबरीमलातील अयप्पास्वामी, गुरुवायूर येथील श्रीकृष्ण मंदिर आणि पद्मनाभस्वामीच्या मंदिरामध्ये दर्शनासाठी एकच गर्दी केली होती.