१७ सप्टेंबरला कावराबांध येथे ओबीसी विद्यार्थांची कार्यशाळा

0
18

सालेकसा:गोंदिया जिल्हा ओबीसी संघर्ष कृती समिती,ओबीसी सेवा संंघाच्यावतीने येत्या १७ सप्टेंबर रोजी जी.के.ज्युनीयर कॉलेज कावराबांध येथे ओबीसी विद्यार्थांसाठी  ओबीसींचे आरक्षण,शिष्यवृत्ती आणि अधिकार या विषयावर कार्यशाळेचे आयोजन सकाळी ११ वाजता करण्यात आले आहे.या कार्यशाळेला ओबीसी संघर्ष कृती समितीचे अध्यक्ष बबलू कटरे,कार्याध्यक्ष अमर वराडे,सेवा संघाचे अध्यक्ष प्रा.बी.एम.करमरकर,सावन कटरे,कैलास भेलावे,विनायक येडेवार,मनोज मेंढे आदी मान्यवर मार्गदर्शन कररणार आहेत.या ओबीसी कार्यशाळेचा लाभ परिसरातील ओबीसी विद्यार्थी,पालकांनी घ्यावे असे आवाहन ओ.एस.गुप्ता,जे.एस.बागडे,ह.भू.पटले,आय.टी.निनावे,ललीत बनोटे व महेंद्र उके यांनी केले आहे.