घुसखोर दहशतवाद्यांना सर्जिकल स्ट्राईकद्वारे चोख प्रत्युत्तर – राष्ट्रपती

0
17

नवी दिल्ली, दि. ३१ – संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन आजपासून सुरू होत असून त्या पार्श्वभूमीवर राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी संसदेच्या संयुक्त सभागृहापुढे अभिभाषण केले. ‘ हे अधिवेशन ऐतिहासिक’ असल्याचे सांगत राष्ट्रपतींनी सरकारने राबवलेल्या विविध योजना, धोरणांचा आढावा घेतला. गरीब, दलित, शोषित, शेतकरी आणि श्रमिक वर्ग सरकारच्या धोरणात अग्रस्थानी असल्याचे त्यांनी नमूद केले. या भाषणात त्यांनी नोटांबदी व पाकव्याप्त काश्मीरमध्ये केलेल्या सर्जिकल स्ट्राईकचाही उल्लेख केला. सतत होणा-या घुसखोरीला आळा घालण्यासाठी सर्जिकल स्ट्राईक हे चोख प्रत्युत्तर ठरेल असे त्यांनी नमूद केले. तर काळा पैसा, भ्रष्टाचार, बनावट नोटा आणि दहशतवादासाठी होणारा पैशांचा पुरवठा रोखण्यासाठी सरकारने ८ नोव्हेंबर २०१६ रोजी ‘ नोटाबंदी’चा निर्णय घेतल्याचेही राष्ट्रपतींनी सांगितले.

राष्ट्रपतींच्या भाषणातील वैशिष्ट्ये –

स्वातंत्र्य भारतात प्रथमच रेल्वे आणि अर्थसंकल्प सादर करण्यात येत आहे
सबका साथ, सबका विकास हे सरकारचे लक्ष्य
देशात 1.2 कोटी नागरिकांनी एलपीजीवरील अनुदान नाकारले
राष्ट्र निर्माणासाठी आमचे सरकार प्रयत्न करत आहे
सरकार गरिब, वंचित, शेतकरी, युवकांसाठी काम करत आहे
20 कोटींपेक्षा अधिक रु पे कार्ड देण्यात आली असून, कॅशलेससाठी उपयोग होणार
स्वच्छ भारत अभियान देशात आंदोलन बनले आहे
26 कोटी नागरिकांना जनधन खाते उघडले
बँकिंग यंत्रणेशी नागरिकांना जोडण्यात आले
मुद्रा योजनेअंतर्गत 2 लाख कोटींचे कर्जवाटप
महिलांनी सुरु केलेल्या उद्योगांना प्रोत्साहन देण्याचे काम केले
छोट्या उद्योगांना चालना देण्यासाठी मदत
घर आणि आरोग्यासाठी काम करण्यात येत आहे
गरिबांसाठी पंतप्रधान आवास योजना सुरु करण्यात आली
2022 पर्यंत प्रत्येक नागरिकाला घर देण्याचे आश्वासन
उत्तम आरोग्यासाठी स्वच्छ भारत अभियान उपयोगाचे
या अभियानांतर्गत 3 कोटी शौचालयांची निर्मिती
पंतप्रधान उज्वल्ला योजनेंतर्गत गरिबांना गॅसजोडणी
यामध्ये 37 टक्के नागरिका अनुसूचित जाता व जमातींचे
दीड कोटी नागरिकांना मोफत गॅसजोडणी देण्यात आली
गावांतील महिलांना चुलीऐवजी गॅस कनेक्शन देण्यात आले
ग्राम ज्योती योजनेंतर्गत गावांतील आंधार दूर करणार
कमीतकमी वेळात 11 हजार गावांत वीज पोचविण्यात आली
इंद्रधनुष्य योजनेंतर्गत 55 लाख मुलांना लसीकरण करण्यात आले
शेतकऱ्यांच्या हितासाठी सरकारने काम केले
पंतप्रधान पीक वीमा योजनेंतर्गत शेतकऱ्यांना मदत झाली
3.66 कोटी शेतकऱ्यांना पीक विमा योजनेची मदत मिळाली
खरीपाच्या पेरणीत सहा टक्क्यांनी वाढ झाली
शेतकऱ्यांना क्रेडीट कार्ड देण्यात आले
प्रत्येक शेताला पाणी या योजनेंतर्गत काम करण्यात आले
शेतकऱ्यांना किटकनाशकांचा पुरवठा करण्यात आला
शेतकऱ्यांना त्यांच्या पिकाला योग्य किंमत मिळवून देण्यात आली
सरकारच्या योजनांमुळे दाळीच्या किंमतींमध्ये घट झाली
भ्रष्टाचार, काळा पैसा याविरोधात नागरिकांना केलेली मदत मोलाची
वीजेच्या बचतीसाठी 3 कोटी एलईडी बल्ब देण्यात आली
महिलांच्या प्रसृती रजेत वाढ करून, ती 26 आठवड्यांची करण्यात आली
पहिल्यांदाच वायुसेनेत महिलांना पायलटचा दर्जा देण्यात आला
बेटी बचाओ, बेटी पढाओ हे अभियान सुरु करण्यात आले
युवकांच्या कौशल्य विकासासाठी 24 हजार कोटी खर्च करण्यात आले
कौशल्य विकासाद्वारे तरुणांना रोजगाराच्या संधी उपलब्ध व्हाव्यात म्हणून माझ्या सरकारने अनेक पावले उचलली
स्किल डेव्हलपमेंटसाठी नवी योजना लागू करण्यात आली
या योजनेमुळे अर्थव्यवस्था मजबूत झाली
55 लाख नागरिकांचा पीएफसाठी यूएन खाते क्रमांक सुरु करण्यात आला
ज्येष्ठ नागरिकांना 8 टक्के व्याजदर लागू करण्यात आला
आदिवासींच्या विकासासाठी कल्याणकारी योजना सुरु केल्या
अपंगांसाठी आरक्षणामध्ये वाढ करून 4 टक्के करण्यात आले
सरकारने अपंगांना बरोबरीत आणण्याचे काम केले
पॅरालिंपिक खेळांमध्ये अपंगांनी आपली प्रतिभा दाखविली
सरकारच्या प्रत्येक योजनेत गरिबांचा विकास
ऑलिंपिकमधील यश हे आपल्या देशातील महिला शक्तीचे यश सांगते
समाजातील सामाजिक आणि आर्थिक विषमता कमी करण्यासाठी चांगले प्रयत्न सरकारने केले आहेत
अरुणाचल, मेघालयमध्ये रस्त्यांचे जाळे निर्माण करण्यात आले
ईशान्येकडील राज्यांसाठी अष्टलक्ष्मी योजना
पूर्वेकडील राज्यांच्या विकासासाठी सरकारने जोर दिला
रेल्वेच्या आधुनिकीकरणासाठी सरकार काम करत आहे
रस्त्याच्या माध्यमातून प्रत्येक गावांना शहराशी जोडण्यात येणार
70 हजार किलोमीटरचे रस्ते बनविण्यात आले
चार दशकांपासून होत असलेली वन रँक वन पेन्शनची मागणी पूर्ण करण्यात आली
आंतराळ क्षेत्रात देशात मोठे काम झाले
भ्रष्टाचार आणि काळा पैसा रोखण्यासाठी नोटाबंदीचा निर्णय घेण्यात आला
काळ्या पैशावर निर्बंध येण्यासाठी एसआयटी स्थापन करण्यात आली
काळ्या पैशाचे मॉरिशस आणि सिंगापूरचे मार्ग बंद झाले
स्कॉलरशिप आणि फेलोशिपला चालना देण्यात आली
गावातील पायाभूत सुविधांच्या विकासावर भर देण्यात येणार
ग्रामपंचायतींच्या विकासासाठी 2 लाख कोटी रुपये देण्यात येणार
एलओसीपलिकडे जाऊन यशस्वीरित्या सर्जिकल स्ट्राईक करण्यात आले
दहशतवादाला रोखण्यासाठी सरकारने महत्त्वपूर्ण निर्णय घेतला
सरकारने दहशतवादाला सडेतोड प्रत्युत्तर दिले
जम्मू काश्मीरमध्ये पुरस्कृत दहशतवाद पसरविण्यात आला
दुसऱ्या देशांशी मिळून दहशतवादाला उत्तर दिले जात आहे
भीम ऍपच्या माध्यमातून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना श्रद्धांजली देण्यात आली
डिजिटल पेमेंटला चालना देण्यासाठी अनेक निर्णय घेण्यात आले
एक भारत श्रेष्ठ भारतवर काम करण्यात येत आहे
जीएसटी लवकरच लागू करण्यात येणार आहे, देशात एकच प्रकारचा कर असेल
परदेशी गुंतवणुकीत वाढ झाली आहे
उद्योगांसाठी नियमावली सोपी करण्यात आली
सरकार केंद्र आणि राज्यांच्या निवडणुका एकत्र घेण्यासाठी तयार
2016 पर्यंत पर्यटन उद्योगात मोठी वाढ