देश तुमच्याकडे आशेने बघतेय-खा.प्रफुल पटेल

0
12

१११ वी मनोहरभाई पटेल जंयती उत्साहात

गोदिया,,berartimes.comदि.०९-: गोंदिया भंडारा जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी सदैव पुढाकार घेतला असून दोन्ही जिल्ह्यात qसचन क्रांतीसोबतच उद्योग आणून रोजगार उपलब्ध करुन देण्याचे काम आपण केले आहे.परंतु विद्यमान सरकारने भेलचा कारखाना बंद पाडून रोजगार हिरावून घेतल्याचे सांगत शेतकèयांना समर्थन मुल्य त्यांच्या उत्पादीत मालाला मिळाले पाहिजे यासाठी नितिशकुमारजी आपल्या सारख्या नेत्याची देशाला खरी गरज आहे.देश तुमच्याकडे आशेच्या नजरेने बघत असून बिहारच्या बाहेर येऊन तुम्ही देशाच्या सक्रीय राजकारणात येण्यासाठी येथून नवी सुरवात करण्याचा आग्रह धरला.गोंदिया शिक्षण संस्थेतील १ लाख २० हजार विद्याथ्र्यांना परवडेल अशा शुल्कात शिक्षण उपलब्ध करुन दिले जात असल्याचे सांगत उद्योगपतींनी या भागाकडे लक्ष देण्याची गरज असल्याचे म्हणाले.
ते गोंदिया-भंडारा जिल्ह्याचे शिक्षणमहर्षी स्व.मनोहरभाई पटेल यांच्या १११ व्या जयंती सोहळ्याचे अध्यक्ष म्हणून बोलत होते. हा सोहळा गोंदिया शिक्षण संस्थेच्या डी.बी.सायंस कॉलेजच्या पटागंणावर आयोजित करण्यात आला होता.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी केंद्रीय मंत्री खासदार प्रफुल पटेल होते तर अतिथी म्हणून जनता दल (युनायटेड)चे राष्ट्रीय प्रवक्ता माजी खासदार के.सी.त्यागी, माजी खा.पवन वर्मा,उद्योगपती शशी रुईया,भारतीय फुटबॉल टीमचे माजी कर्णधार बाईचुंग भुटीया,माजी मंत्री अनिल देशमुख,आमदार गोपालदास अग्रवाल,माजी आमदार दिलीप बनसोड,नाना पंचबुध्दे,अनिल बावनकर,बंडु सावरंबांधे,रामरतन राऊत,मधुकर कुकडे,विजय शिवणकर,नरेश माहेश्वरी,गोंदिया शिक्षण संस्था व मनोहरभाई पटेल अकादमी अध्यक्षा वर्षा पटेल,गुजरातचे धिरु राजा,भगीरथ पटेल,अजय वडेरा आदी मान्यवर उपस्थित होते.मुख्यमंत्री नितिशकुमार यांच्याहस्ते १३ मुली व ३ मुलांचा मनोहरभाई पटेल सुवर्णपदक देऊन सत्कार करण्यात आला.
यावेळी उद्योगपती शशी रुईया यांनी पायलट प्रशिक्षण केंद्र व अभियांत्रिकी महाविद्यालय बघून उच्चशिक्षणात आदिवासी बहुल जिल्हा सुध्दा पुढे गेल्याबद्दल कौतुक करीत विज्ञानाची जोड कृषीच्या क्षेत्रात उपलब्ध झाली पाहिजे असे म्हणाले. भारतीय फुटबाल संघाचा माजी कर्णधार बाईqचग भुटिया यांनी आपण गोंदियापेक्षाही लहानश्या शहरातून आलो आहे.देशात फुटबॉलला क्रिकेटनंतर लोकप्रिय करण्यासाठी फेडरेशनचे अध्यक्ष प्रफुलभार्इंनी खुप मेहनत घेतली असून त्यांच्याच पुढाकाराने येत्या ऑक्टोंबर महिन्यात जागतिक अंडर १६ फुटबॉल स्पर्धा भारतात होत असल्याचे सांगत भविष्यात गोंदियातूनही चांगले फुटबॉलपटू देशाच्या संघात सहभागी होतील अशी आशा व्यक्त करीत आपली पत्नी मराठी असल्याने महाराष्ट्राशी आपले नाते असल्याचा उल्लेख केला.माजी खासदार के.सी.त्यागी यांनी मनोहरभाई पटेल या भागात आले नसते तर बहुधा शिक्षणाची दारे उघडली गेली नसती असा उल्लेख केला.सोबतच आम्ही उत्तरभारतीय नेते १०० टक्के राजकारण करतो परंतु महाराष्ट्रात राजकारणासोबतच समाजकारण केले जाते.आमच्याकडे कुठल्याही नेत्याचे एवढ्या मोठ्या शिक्षणसंस्था नाहीत qकवा कृषीच्या क्षेत्रात काम करीत नाही हे आम्हाला शिकण्यासारखे असल्याचे म्हणाले. यावेळी पवन वर्मा व गोपाल अग्रवाल यांनीही विचार व्यक्त केले.संचालन माजी आमदार राजेंद्र जैन यांनी केले.कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगिताने करण्यात आली.