रविंद्र गायकवाडांवरील बंदीवरुन संसदेत शिवसेना आक्रमक

0
7

नवी दिल्ली, दि. 27 – उस्मानाबादचे शिवसेना खासदार रविंद्र गायकवाड यांना विमानात प्रवेश न देण्याच्या भारतीय हवाई कंपन्यांच्या निर्णयाचे सोमवारी सरकारने समर्थन केले. नियम सर्वांसाठी सारखे आहेत. खासदार असे वर्तन करेल अशी मी स्वप्नातही कल्पना केली नव्हती. कुठल्याही प्रकारचा हिंसाचार विमानासाठी आपत्ती असते असे केंद्रीय हवाई वाहतूक मंत्री गजपती राजू म्हणाले.
मागच्या आठवडयात शिवसेना खासदार रविंद्र गायकवाड यांनी बिझनेस क्लासचे तिकिट असताना इकोनॉमी क्लासमधून प्रवास करावा लागला म्हणून एअर इंडियाच्या कर्मचा-याला पायातील चप्पल काढून मारहाण केली होती. या घटनेचे हवाई क्षेत्रात अपेक्षेप्रमाण तीव्र पडसाद उमटले. भारतीय हवाई कंपन्यांनी रविंद्र गायकवाड यांचा नो फ्लाय यादीत समावेश केला. त्यामुळे त्यांच्या विमान प्रवासावर बंदी आली आहे.
दरम्यान शिवसेनेने आज रविंद्र गायकवाडचा मुद्दा संसदेत उपस्थित केला. विमानात गैरवर्तन करणा-या कपिल शर्मावर कारवाई होत नाही मग रविंद्र गायकवाडांवरच कारवाई का ? असा प्रश्न शिवसेनेच्या खासदारांनी विचारला. दरम्यान गायकवाडांचा नो फ्लाय यादीत समावेश करण्याच्या हवाई कंपन्यांच्या निर्णयावर शिवसेनेचे खासदार लोकसभा अध्यक्ष सुमित्रा महाजन यांच्याशी चर्चा करत आहे.