‘लेक वाचवा, लेक शिकवा’ संदेश गावापर्यंत पोचविणाऱ्या नागपूरच्या युवांचे देवरी येथे स्वागत

0
26

देवरी दि.२७- – स्त्री भ्रूण हत्येला देशातून कायम हद्दपार करून महिला शिक्षणाचे महत्व देशवासियांना पटवून देण्याचे उद्देशाने सुरू केलेल्या ‘लेक वाचवा, लेक शिकवा’ अभियान देशभरात पोचविण्यासाटी नागपूरच्या 10 युवक-युवतींनी नागपूर ते रायपूर सायकल रॅली काढली. या रॅलीचे देवरी जंगी स्वागत करण्यात आले.
नागपूरच्या गांधीबाग परिसरातूनरविवारी (ता.26) सकाळी 8 वाजे निघालेल्या या रॅलीचे देवरी शहरात काल रविवारी रात्री 8 वाजता या युवक-युवतींचे आगमन झाले. या युवकांनी अवघ्या 24 तासात नागपूर ते रायपूर हे 300 किमीचे अंतर पार करण्याचे उद्दिट्ये ठेवले आहे. देवरी शहरवासींयातर्फे या अपार युवाग्रुपमधील सदस्यांचे अर्बन बॅंकेचे महेश जैन यांनी स्वागत केले. यावेळी पोलिस उपनिरीक्षक सूर्यकांत सपताळे, रितेश अग्रवाल, गोपाल तिवारी, अनिल शर्मा, नरेश जैन आदींनी स्वागत केले. दरम्यान या ग्रुप मधील सदस्यांना अल्पोपहार देण्यात आले. या ग्रुप मधील सदस्यांमध्ये सिमरन मेश्राम, ऐश्वर्या मेश्राम,अंजली गेडाम, अपूर्व नायक, रजत वानखेडे, रोशन झुनझुनकर,सुरेश लांगे, शत्रूघ्न पटले, आकाश चौरीया आमि शिवराज खुटीया यांचा समावेश आहे.
स्त्रीयांवर होणारे अत्याचार, स्त्रीभ्रूण हत्या, हुंडाबळी, स्री-पुरूष असमानता या विषयावर नागरिकांचे प्रबोधन व्हावे, या उद्देशाने या रॅलीचे आयोजन करण्यात आल्याचे या ग्रुपमधील सदस्यांनी सांगितले. मुलींना शिक्षित केले तर समाजाची प्रगती शक्य आहे. आज सर्वच क्षेत्रात महिला आपले वर्चस्व सिद्ध करू लागल्या आहेत. अशा परिस्थितीत गावागावातील मुली ह्या शिक्षणापासून वंचित राहू नये, असा मनोदय सुद्धा त्यांनी व्यक्त केला. येत्या डिसेबर पासून कश्मिरपासून कन्याकुमारीपर्यंत 20-20 दिवसांची रॅली करून गावागावात प्रबोधनात्मक रॅलीचे आयोजन करण्याचा मानसही त्यांनी यावेळी बोलून दाखविला. या युवांच्या कार्याचे देवरीवासीयांनी भरभरून कौतुक केले.