राष्ट्रपतीपदाची निवडणूक 17 जुलैला

0
7

नवी दिल्ली, दि. 7 : देशाचे सर्वोच्च पद असलेल्या राष्ट्रपतीपदाची निवडणुक 17 जुलै रोजी होणार असल्याचे निवडणुक आयोगाने आज जाहीर केले आहे. राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठीची मतमोजणी 20 जुलै रोजी होणार आहे. राष्ट्रपतीपदासाठी अर्ज दाखल करण्याची तारिख 14 जून आहे. तर अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख 28 जून असेल. 29 जून रोजी आलेल्या अर्जाची पडताळणी करण्याच येईल. अर्ज माघारी घेण्याची मुदत 1 जुलै असेल्याचे निवडणुक आयोगाने स्पष्ट केले.

राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसाठी व्हीप नसल्याचे केंद्रीय निवडणूक आयोगाने यावेळी स्पष्ट केले. 24 जुलै रोजी विद्यमान राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांचा कार्यकाळ संपत आहे. त्यापूर्वीच भारताच्या 14 व्या राष्ट्रपतीपतीची निवड होणार आहे.

राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत यंदा संसदेच्या दोन्ही सभागृहांत 776 खासदार व सर्व राज्यांतील मिळून 4120 आमदार मतदान करणार आहेत. आमदार, खासदारांचे मिळून मतदानाचे जे निर्वाचक मंडळ (इलेक्टोरल कॉलेज) तयार करण्यात आले आहे, त्याचे एकूण मतमूल्य 10,98,882 इतके आहे. देशातील सर्व आमदारांच्या मतमूल्याची बेरीज 5 लाख 49 हजार 474 इतकी आहे. तर 776 खासदारांच्या मतमूल्याची बेरीज 5 लाख 49 हजार 408 आहे. राष्ट्रपतीपदावर निवडून येण्यासाठी यापैकी किमान 5 लाख 49 हजार 441 मतांची आवश्यकता आहे.