पॉल यांचा उत्तराखंड राज्यपालपदाचा शपथविधी

0
9

देहरादून- भारतीय पोलिस सेवेतील (आयपीएस) निवृत्त अधिकारी कृष्णकांत पॉल यांनी आज (गुरुवारी) उत्तराखंडच्या सहाव्या राज्यपाल पदाची शपथ घेतली.

उत्तराखंड उच्च न्यायालयाचे वरिष्ठ न्यायाधीश व्ही.के. बिश्त यांनी पॉल यांना पद व गोपनीयतेची शपथ दिली. राजभवनच्या आवारात आयोजित करण्यात आलेल्या या शपथविधी कार्यक्रमाला मुख्यमंत्री हरीश रावत, विधानसभा अध्यक्ष गोविंदसिंह कुंजवाल, विरोधी पक्षनेते अजय भट आणि मुख्य सचिव एन. रविशंकर यांच्यासह वरिष्ठ अधिकाऱ्यांचे शिष्टमंडळ उपस्थित होते.

‘लोकशाही मूल्यांची जपणूक करून, आतापर्यंतच्या उच्च परंपरा जपू,‘ असे यावेळी केलेल्या छोटेखानी भाषणात पॉल सांगितले. पॉल यांनी यापूर्वी मेघालयचे राज्यपाल म्हणून कार्यभार सांभाळला आहे. तसेच, मणिपूर आणि मिझोरामचा अतिरिक्त जबाबदारीही त्यांनी सांभाळली आहे.