अखेर नितीशकुमार विश्वासमत जिंकले

0
7

पाटणा, दि. 28 – सहाव्यांदा बिहारच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणा-या नितीश कुमार यांनी शुक्रवारी बिहार विधानसभेमध्ये विश्वासदर्शक ठराव जिंकला मात्र यावेळी विधानसभेत प्रचंड गोंधळ सुरु झाला आहे. दरम्यान तेजस्वी यादव यांची विरोधी पक्षनेता म्हणून घोषणा करण्यात आली आहे. यावेळी तेजस्वी यादव यांनी नितीश कुमारांवर हल्लाबोल करत माझ्या आत्मविश्वासाला नितीश कुमार घाबरले असा टोला लगावला आहे. जेडीयू आमदारांनी मात्र आपण सहजपणे बहुमत सिद्ध करु असं सांगितलं आहे. 243 जागांच्या विधानसभेत एनडीएच्या सहाय्याने नितीश कुमार यांनी बहुमताचा 122 हा आकडा गाठला असल्याचा दावा करण्यात आला आहे. एनडीएकडून बुधवारी राज्यापालांना 132 आमदारांची यादी सोपवण्यात आली. यामध्ये जेडीयूचे 71, भाजपाचे 53, आरएलएसपीचे दोन, एलजेपीचे 2 आणि तीन अपक्ष आमदारांचा समावेश आहे.
‘बिहारमधील लोकांना खूप सहन करावं लागलं आहे. आमच्याकडे 80 आमदार आहेत. मला हटवू शकत नाही हे नितीश कुमार यांना चांगलंच माहित होतं. हे सर्व सहा महिन्यांच्या तयारीनंतर करण्यात आलं आहे’, असं तेजस्वी यादव बोलले आहेत.
दुसरीकडे पाटणा उच्च न्यायालयात नितीश कुमार यांच्या जेडीयूने भाजपासोबत हातमिळवणी करत केलेल्या सरकार स्थापनेविरोधात आरजेडीकडून याचिका दाखल करण्यात आली आहे. सोमवारी याचिकेवरील सुनावणी होणार आहे.