डॉ. आंबेडकरांचे लंडनमधील निवासस्थान सरकार विकत घेणार

0
9

मुंबई – डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे लंडनमधील दोन हजार ५० चौरस फूटांचे निवासस्थान महाराष्ट्र सरकराने विकत घेण्याचा निर्णय घेतला आहे.
लंडनमधील किंग हेन्री रोडवरील हे निवासस्थान ३५ कोटी रुपयांना विकत घेण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. १४ एप्रिल रोजी डॉ. आंबेडकर यांच्या जयंतीदिवशी हे निवासस्थान जनतेसाठी खुले कऱण्यात येणार असल्याची माहिती शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी दिली. ते सध्या लंडनमध्ये आहेत.
भाजपाचे मुंबई प्रदेशाध्यक्ष आशिष शेलार यांनी काही दिवसांपूर्वीच अर्थमंत्री अरुण जेटलींना यासंबंधित पत्र लिहिले होते. हे निवासस्थान विकत घेण्याबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी लक्ष घालावे अशी विनंती त्यांनी या पत्राद्वारे केली होती. महाराष्ट्रातील जनता आणि आंबेडकरांच्या अनुयायांसाठी हा भावुक मुद्दा आहे. असे शेलार यावेळी म्हणाले. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनीही केंद्र सरकारकडे निवासस्थान विकत घेण्याबाबतची मागणी केली होती.
दरम्यान, सरकारच्या या निर्णयाचे दलित नेत्यांकडून स्वागत करण्यात आले आहे. राज्य सरकारने घेतलेला हा निर्णय चांगला आहे मी यासाठी मुख्यमंत्र्यांचे आभार मानतो असे भारिप बहुजन महासंघाचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी सांगितले.