चिमुकल्या अश्विनीचं ‘शौर्य’ मोदींनाही भावलं!

0
18

नवी दिल्ली : बिबट्याच्या तावडीतून लहान बहिणीची सुटका करणारी, महाराष्ट्राची ‘वाघीण’ अश्विनी उघडे हिचा आज शौर्य पुरस्काराने सन्मान करण्यात आला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुरस्कार मिळालेल्या सर्व धाडसी चिमुकल्यांचं कौतुक केलं.यंदा शौर्य पुरस्कार मिळालेल्या 24 मुलांच्या यादीत नगर जिल्ह्यातलं मेहेन्दुरी गावच्या अश्विनी उघडेचाही समावेश आहे.
सहावीत शिकणाऱ्य़ा अश्विनीने लहान बहिण रोहिणीची बिबट्याच्या तावडीतून सुटका केली होती. अश्विनीच्या अतुलनीय धाडसाबद्दल तिच्या शाळेने राष्ट्रपती पुरस्कारासाठी तिची शिफारस केली होती.आठ ते 18 वर्षांपर्यंतच्या मुलांचा बुद्धीमत्ता आणि धाडसाबद्दल शौर्य पुरस्काराने सन्मान करण्यात येतो. प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला हा पुरस्कार प्रदान करण्यात येतो.भारत सरकार आणि बाल कल्याण विभागामार्फत 1957 पासून या पुरस्कारचं आयोजन करण्यात आलं आहे.वर्ष 2014 चा ‘भारत पुरस्कार’ उत्तर प्रदेशच्या 16 वर्षीय रेशम फातिमा, ‘गीता चोप्रा पुरस्कार’ आसामच्या 13 वर्षीय गुंजन शर्मा आणि ‘संजय चोप्रा पुरस्कार’ उत्तर प्रदेशच्या 16 वर्षीय देवेश कुमारला देण्यात आला.