भारताच्या मनुषी छिल्लरला यंदाच्या विश्वसुंदरीचा किताब

0
17

बीजिंग,दि.18(वृत्तसंस्था): भारताच्या मानुषी छिल्लरनं मिस वर्ल्ड 2017 चा किताब जिंकला आहे.  चीनमध्ये मिस वर्ल्ड 2017चा ग्रँड फिनाले आयोजित करण्यात आला होता. यामध्ये 118 स्पर्धकांनी सहभाग घेतला होता. हरियाणाची असलेली मानुषी छिल्लर 20 वर्षांची आहे.  या स्पर्धेत दुस-या स्थानावर मिस मेक्सिको आणि तिस-या क्रमांकावर मिस इंग्लंड आहे.

चीनमध्ये झालेल्या मिस वर्ल्डच्या स्पर्धेसाठी जवळपास 130 देशातून सौंदर्यवतींना सहभागी झाले होते. 2016 मधील मिस वर्ल्ड प्यूटो रिकोची स्टेफनी डेल वेलीने विश्व सुंदरीचा मुकुट मानुषीच्या डोक्यावर घातला.20 वर्षांची मानुषी छिल्लर ही मुळची दिल्लीची रहिवासी असून ती मेडिकलची विद्यार्थिनी आहे.1966 पर्यंत आशियातील कोणत्याही महिलेला मिस वर्ल्डचा किताब मिळाला नव्हता. पण 1966 मध्ये मेडिकलची विद्यार्थिनी असलेल्या रिता फारिया हिने सर्वात पहिला हा बहुमान मिळवला.यानंतर तीन दशकांनी ऐश्वर्या रायने पुन्हा इतिहास रचत मिस वर्ल्ड हा किताब पटकावला. ऐश्वर्यानंतर अनेक भारतीय सौंदर्यवतींनी हा किताब आपल्या नावावर केला. या यादीत प्रियंका चोप्रा आणि डायना हेडनचाही समावेश आहे.