मेघालय, नागालँड आणि त्रिपुरामधील मतदानाच्या तारखा जाहीर

0
11

नवी दिल्ली,दि.18(वृत्तसंस्था) – निवडणूक आयोगाने गुरुवारी मेघालय, नागालँड आणि त्रिपुरा या ईशान्येकडच्या तीन राज्यांमधील निवडणुकीचे वेळापत्रक जाहीर केले. त्रिपुरामध्ये 18 फेब्रुवारीला तर मेघालया आणि नागालँड या दोन राज्यात 27 फेब्रुवारीला मतदान होणार आहे. या तिन्ही राज्यांमधील मतमोजणी 3 मार्चला होईल. मुख्य निवडणूक आयुक्त एके जोती यांनी हा निवडणूक कार्यक्रम जाहीर केला.

आजपासूनच या तिन्ही राज्यांमध्ये आदर्श अचारसंहिता लागू झाली आहे. मेघालय, नागालँड आणि त्रिपुरामध्ये मिळून विधानसभेच्या एकूण 60 जागा आहेत. मेघालय विधानसभेची मुदत 6 मार्च, नागालँड विधानसभेची मुदत 13 मार्च आणि त्रिपुराची विधानसभेची मुदत 14 मार्चला संपत आहे. निवडणूक आयोगाने उशिरानेच तारखा जाहीर केल्या आहेत. 2013 साली 11 जानेवारीला निवडणूक कार्यक्रम जाहीर केला होता.

कोणत्या राज्यांत कोणाचे सरकार?

> त्रिपुरा

– डाव्याचे सरकार आहे. माणिक सरकार हे मुख्यमंत्री आहेत. 2013 मध्ये डाव्या पक्षाने पाचव्यांदा सरकार स्थापन केले होते.

> मेघालय:

– मेघालयमध्ये काँग्रेसची सत्ता आहे. मुकुल संगमा हे 2010 पासून मुख्यमंत्री आहे.

> नागालंड:

– भाजपच्या पाठिंब्यावर नागा पीपुल्स फ्रंट-लीड डेमोक्रेटिक आघाडीचे सरकार आहे. टीआर जेलियांग यांनी जुलै 2017 मध्ये मुख्यमंत्रिपदाची सूत्रे स्विकारली होती.

2013 मध्ये कोणत्या पक्षाला किती मिळाल्या जागा?

त्रिपुरा- एकूण जागा – 60, बहुमत: 31

– सीपीएम:49
– काॅंग्रेस:10
– अपक्ष : 01

मेघालय: एकूण जागा- 60, बहुमत: 31

– काँग्रेस:29
– यूडीपी: 8
– राष्ट्रवादी: 2
– अपक्ष: 21

नागालंड- एकूण जागा – 60, बहुमत: 31

– एनपीएफ: 38
– काॅंग्रेस: 8
– राष्ट्रवादी: 4
– भाजप: 1
– अपक्ष: 9