सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशपदाची रॉय यांनी घेतली शपथ

0
13

नवी दिल्ली – शुक्रवारी सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशपदाची न्यायाधीश अमित्वा रॉय यांनी शपथ घेतली.

तत्पूर्वी अमित्वा रॉय हे ओडिशा उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश होते. त्यांनी आज सर्वोच्च न्यायालयात न्यायाधीश शपथ घेतली. त्यांच्या शपथविधीनंतर सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशांची संख्या २९ झाली आहे. सर्वोच्च न्यायालयात एकूण ३१ न्यायाधीश असावे, याला काही दिवसांपूर्वीच मंजुरी मिळाली आहे. न्यायाधीश रॉय यांचा कार्यकाळ तीन वर्षांचा असणार आहे.