मसरत विरोधात चौकशीचे आदेश- राजनाथसिंह

0
10

– वृत्तसंस्था
नवी दिल्ली- जम्मू-काश्‍मीरचा फुटीरतावादी नेता मसरत आलम याच्यावर लक्ष ठेवण्याबरोबरच त्याच्याविरोधात असलेल्या 27 गुन्ह्यांबाबत कडक चौकशी करण्याचे आदेश राज्य सरकारला दिले आहेत, असे केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंह यांनी आज (गुरुवार) सांगितले.

संसदेत बोलताना राजनाथसिंह म्हणाले, ‘जम्मू-काश्‍मीरच्या सरकारला आलम विरोधात असलेल्या गुन्ह्यांबाबत कडक चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. शिवाय, सर्वसामान्यांना कोणता त्रास होता कामा नये. आलम व त्याच्या समर्थकांवर लक्ष ठेवण्यास सांगण्यात आले असून, गरज पडल्यास तत्काळ कारवाई करण्यास सांगितले आहे.‘

जम्मू-काश्‍मीरचे मुख्यमंत्री मुफ्ती महंमद सईद यांच्या पीडीपी-भाजप सरकारने फुटीरतावादी नेता मसरत आलम याची कारागृहामधून सुटका केली आहे. त्याच्यावर 27 गंभीर गुन्हे दाखल आहेत.