देशात ११६ जागांवर सरासरी ६५.७० टक्के तर महाराष्ट्रात ६१.३० % मतदान

0
14

नवी दिल्ली(वृत्तसंस्था)दि.24 – सार्वत्रिक निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यात १५ राज्यांतील ११६ जागांवर मंगळवारी सायं. ५.०० पर्यंत ६२.७५% मतदान झाले. २०१४ मध्ये या ११६ जागांवर ७०.११% मतदान झाले होते. २००९ मध्ये येथे ६१.८% मतदान झाले होते. गेल्या वेळी मतदान कलाच्या विश्लेषणातून उघड होते की, मत टक्का वाढल्यावर भाजपला फायदा होतो. २०१४ मध्ये ८.३१% मतदान वाढल्यावर भाजपला या ११६ मतदारसंघांत १९ जागांचा फायदा झाला, तर काँग्रेसला २१ जागांचे नुकसान झाले होते. २००९ मध्ये काँग्रेसला ३८ व भाजपला ४४ मिळाल्या होत्या.

लाेकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यात मंगळवारी मराठवाड्यातील औरंगाबाद, जालन्यासह राज्यातील १४ मतदारसंघांत शांततेत मतदान झाले. सरासरी ६१.३० % मतदानाची नाेंद झाल्याचे निवडणूक आयाेगाने रात्री नऊ वाजता जाहीर केले. काही भागांत ईव्हीएममध्ये तांत्रिक बिघाडाच्या घटना घडल्यामुळे तेथील मतदान उशिरापर्यंत सुरू हाेते. त्यामुळे बुधवारीच मतदानाची अंतिम आकडेवारी जाहीर करण्यात येईल, असे आयाेगाने जाहीर केले.शिवसेनेचे नेते, केंद्रीय मंत्री अनंत गिते, राष्ट्रवादीचे नेते सुप्रिया सुळे, सुनील तटकरे, भाजपचे नेते तथा राज्याचे कॅबिनेट मंत्री गिरीश बापट, प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे आदी दिग्गजांचे भवितव्य ईव्हीएम यंत्रात कैद झाले आहे.

राज्यातील 14 मतदारसंघातील सायंकाळी ६ वाजेपर्यंतचे मतदान

> जळगाव 58.00 %
> रावेर 58.00 %
> जालना 63.00 %
> औरंगाबाद 61.87 %
> रायगड 58.06 %
> पुणे 53.00 %
> बारामती 59.50 %
> अहमदनगर 63.00 %
> माढा 63.00 %
> सांगली 64.00 %
> सातारा 57.06 %
> रत्नागिरी-सिंधुदुर्ग 62.26 %
> कोल्हापूर 69.00 %
> हातकणंगले 68.50 %
एकूण 61.30 %