‘बीएसएफ’ जवानांचे अपघाती मृत्यूचे प्रमाण जास्त

0
7

वृत्तसंस्था
नवी दिल्ली- सीमा सुरक्षा दलाच्या (बीएसएफ) जवानांचे दुचाकी अपघात होऊन मृत्यूचे प्रमाण अधिक आहे. गेल्या वर्षी दुचाकी अपघातात 42 जवानांचा मृत्यू झाला आहे.
‘बीएसएफ‘चे महासंचालक डी. के. पाठक म्हणाले, ‘जवान सुट्टीवर असताना अपघाताच्या घटना घडत आहेत. प्रत्येक महिन्याला 5 जवानांचा अपघाती मृत्यू होत आहे. जवान सुटीनिमित्त त्यांच्या घरी जात असतात. दरम्यानच्या काळात अपघात होऊन मृत्युमुखीच्या घटना घडत आहेत. सन 2014 ते मार्च 2015 दरम्यान 42 जवानांचा अपघाती मृत्यू झाला तर सीमेवर कारवाईदरम्यान 12 जवानांचा मृत्यू झाला आहे. गेल्या 45-50 वर्षांपासून अशी परिस्थिती आहे.‘

‘आमचे जवान ही आमची सगळ्यात मोठी संपत्ती आहे. परंतु, अपघात आम्ही टाळू शकत नाही. मोटारसायकल अपघात ही आमच्यासाठी मोठी चिंता बनली आहे. अपघात टाळण्यासाठी आम्ही काही उपाययोजना आखत आहोत, असेही पाठक म्हणाले.