गोंदिया-भंडारा जिल्हा पालकमंत्रीपदी ना.डॉ. फुके

0
10

गोंदिया- राज्य सरकारच्या मंत्रिमंडळात अलिकडेच खांदेपालट करीत विस्ताराचे सोपस्कार पार पडले. या नव्या मंत्रिमंडळ विस्तारामध्ये मंत्र्याच्या कामाचे मूल्यांकन करून काहींना डच्चू देत नव्या चेहऱ्यांना संधी देण्यात आली. परिणामी, राज्यातील एकूण आठ जिल्हांमध्ये पालकमंत्री बदलण्यात आले. यामध्ये गोंदिया जिल्ह्याचे पालकत्व नव्याने राज्यमंत्री झालेल्या डॉ. परिणय फुके यांच्या खांद्यावर देत त्यांचेकडे भंडारा जिल्ह्याचे अतिरिक्त पालकत्वसुद्धा देण्यात आले आहे.
नव्याने पालकमंत्रिपद सोपविण्यात आलेल्या जिल्ह्याची संख्या आठ असून यामध्ये अमरावती जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. अनिल बोंडे, पालघरचे पालकमंत्री म्हणून रवींद्र चव्हाण, हिंगोलीचे पालकमंत्रीपदी अतुल सावे, वर्धाचे पालकमंत्री म्हणून चेंद्रशेखर बावणकुळे, बुलढाण्याचे डॉ. संजय कुटे, गडचिरोलीचे पालकमंत्री म्हणून सुधीर मुनगंटीवार आणि गोंदिया व भंडारा जिल्ह्याची जबाबदारी डॉ. परिणय फुके यांचेवर सोपविण्यात आली आहे.