कुख्यात मसरत नजरकैदेत, ६ जणांवर कारवाई

0
17

नवी दिल्ली – हुरियत कॉन्फरन्सच्या मसरत आलम, सय्यद अली शाह गिलानी, मीरवाइज उमर फारूक आणि शब्बीर शाहसह ६ फुटीरवादी नेत्यांना गुरुवारी रात्री नजरकैदेत ठेवण्यात आले. हे नेते शुक्रवारी पुलवामा जिल्ह्यातील त्रालमध्ये सभा घेणार होते. मुख्यमंत्री मुफ्ती मोहम्मद सईद यांच्या आदेशानंतर पोलिसांनी सभेची परवानगी रद्द केली आहे.त्पूर्वी मसरतसह हुरियत नेत्यांनी निदर्शने करताना पाकचा झेंडा फडकावल्यानंतर केंद्राने सईद सरकारला चांगलीच तंबी दिली. यानंतर सईद सरकारने मसरत आलम, गिलानी, मीरवाइज फारूक आणि इतर फुटीरवाद्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला होता. पक्ष या कारवाईमुळे घाबरणार नाही, अशी टिप्पणी करत हुरियत कॉन्फरन्सने या कारवाईला विरोध केला. केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंह यांनी बुधवारी रात्रीच मुख्यमंत्री सईद यांना या फुटीरवाद्यांवर कारवाई करण्यास सांगितले होते. जम्मू-काश्मीर भाजपनेही मसरत आणि गिलानी यांना अटक करण्याची मागणी केली होती. यावर मसरतने गुरुवारी ‘पाकिस्तानी ध्वज फडकवण्यात काहीच गैर नाही. असे १९४७ पासून घडत आहे,’ असे राष्ट्रद्रोही वक्तव्य केल्याने पोलिसांनी त्याला रात्री नजरकैद केले.