सौरव गांगुली प्रशिक्षकपदासाठी इच्छुक

0
18

कोलकाता – भारतीय क्रिकेटला आक्रमक चेहरा देणारा माजी कर्णधार आणि डावखुरा फलंदाज सौरव गांगुली डंकन फ्लेचर यांची जागा घेण्यासाठी इच्छुक असल्याचे वृत्त एका इंग्रजी वर्तमानपत्राने दिले आहे.
गांगुलीला भारतीय क्रिकेट संघाच्या प्रशिक्षकपदामध्ये रस असून, त्याने बीसीसीआयचे नवनियुक्त अध्यक्ष जगमोहन दालमिया यांच्याकडे प्रशिक्षकपदासाठी अनौपचारिक शब्द टाकल्याची माहिती क्रिकेट असोशिएशन ऑफ बंगालमधील सूत्रांनी दिली.
विश्वचषक स्पर्धेनंतर फ्लचेर यांचा बीसीसीआयसोबतचा करार संपुष्टात आला आहे. क्रिकेटपटू म्हणून सौरवने जे साध्य केले आहे त्यामुळे तो या पदासाठी दावेदार ठरु शकतो. मात्र त्याला प्रशिक्षकपदासाठी अर्ज करावा लागेल.
दालमियांसोबत सौरवने चर्चा केली असली तरी, दालमियांनी त्याला कुठलेही आश्वासन दिलेले नाही असे सूत्रांनी सांगितले. जे कोणी प्रशिक्षकपदासाठी इच्छुक आहेत त्यांना रीतसर अर्ज करावा लागेल.