भूमी अधिग्रहण’ शेतकऱ्यांसाठी: पंतप्रधान मोदी

0
5

नवी दिल्ली –भूमी अधिग्रहण विधेयकावरून देशातील राजकीय वातावरण चांगलेच तापले असून सत्ताधारी पंतप्रधान नरेंद्र मोदी आपल्या विधेयकांचा आणि धोरणांचा डंका वाजवताना दिसताहेत. भूमी अधिग्रहण विधेयक हे शेतकऱ्यांच्याच भल्यासाठी आहे अंबानींसाठी नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.

विरोधी पक्षाने आक्रमक भूमिका घेत भूमी अधिग्रहण विधेयकावर टीकेची झोड उठवली आहे. त्यामुळे नरेंद्र मोदी यांनी भाजप खासदारांच्या वर्कशॉपमध्ये आपली भूमिका स्पष्ट केली. विरोधी पक्षाचे नेते भारतीय लोकांमध्ये विधेयकांसंदर्भात गैरसमज पसरवत आहे, असे मोदी म्हणाले.
भूमी अधिग्रहण कायदा हा गरीबांसाठी आणि सामान्य जनतेसाठी आहे. मुकेश अंबानींसारख्या उद्योगपती किंवा कुण्या वृत्तपत्राच्या किंवा न्यूज चॅनलच्या मालकाचे घर बनवण्यासाठी नाही हा कायदा नाही. पंतप्रधान मोदी यांनी आपल्या भाषणात परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज आणि परराष्ट्र राज्यमंत्री व्ही. के. सिंग यांच्या कामाच्या पद्धतीचे कौतुकही केले. मोदी सरकार जे काम करत आहे ते लोकांपर्यत कसे पोहोचवता येईल याचे मार्गदर्शन करण्यासाठी हे वर्कशॉप ठेवण्यात आले होते. तसेच या वर्कशॉपमध्ये महिलांसाठी शौचालय आणि गरीबांसाठी घर, सब्सीडी वाले गॅस यासंदर्भातही पुन्हा वक्तव्य केले. गरीबांच्या घरात गॅस उपलब्ध करून देण्यासाठी कटिबद्ध असल्याचे त्यांनी पुन्हा सांगितले.