मी नाही रडलो, कोणी बघितले रडताना

0
31

नवी दिल्ली- काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांच्याविरुद्धच्या वर्णद्वेषी टिप्पणीबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदींनी गिरिराज सिंह यांची चांगलीच कानउघडणी केली. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मोदींनी दिलेल्या तंबीनंतर गिरीराज सिंह यांच्या डोळ्यात अश्रूही तरळले. सोनिया गांधी यांच्याविरुद्धच्या वर्णद्वेषी टिप्पणीबद्दल काँग्रेसच्या खासदारांनी सोमवारी गिरिराज सिंह यांच्यावर जोरदार हल्ला चढविला होता. भाजपा खासदार व मंत्र्यांच्या अशा वक्तव्यामुळे लोकांना शरमेने मान खाली घालावी लागते. यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदीं यांनी माफी मागितली पाहिजे, अशी मागणीही काँग्रेसतर्फे करण्यात आली होती. या सर्व प्रकारामुळे संतप्त झालेल्या मोदींनी सिह यांना चांगलेच फैलावर घेतले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कानउघडणी केल्यानंतर गिरीराज सिंह यांना रडू कोसळले हे वृत्त केंद्रीय राज्यमंत्री गिरीराज सिंह यांनी फेटाळून लावले आहे.मी पंतप्रधानांना भेटलोच नाही. मी त्यांच्या भेटीसाठी वेळही मागितला नाही मग खरडपट्टी तर दूरच राहिली. माझ्याविरोधात षडयंत्र रचले जात आहे. मीडिया बेसलेस बातम्या चालवत आहे.’