‘मन की बात’मध्ये मोदी म्हणाले, भूकंपग्रस्तांचे अश्रू पुसणार

0
10

वी दिल्ली – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी आकाशवाणीचा कार्यक्रम ‘मन की बात’मध्ये उद्‍धवस्त झालेल्या नेपाळची सर्वप्रकारे मदत करू, असे आश्वासन दिले. पंतप्रधान मोदी म्हणाले की, “आज मला ‘मन की बात’मध्ये संबोधित करण्‍याची इच्छा होत नाही आहे. नेपाळमध्ये जे नुकसान झाले ते पाहून फार दुःखी झालो आहे. आम्ही नेपाळचे अश्रू पुसणार आहोत. देशातही अनेक ठिकाणी अशा प्रकारचा भूकंप झाला आहे, अनेकांचे प्राण गेले आहेत. त्या सर्वांनाच सरकार मदत करेल.”

नेपाळमध्ये आलेल्या भूकंपामुळे हजारो नागरिकांचा मृत्यू झाल्यानंतर नरेंद्र मोदी यांनी स्वतः पुढाकार घेऊन नेपाळच्या पंतप्रधानांना फोन करून मदतीचे आश्वासन दिले होते.

‘मी भूकंपाचा कहर पाहिला आहे’
पंतप्रधान मोदी म्हणाले की, ” मी 2001 साली कच्छमध्ये आलेला भूकंप पाहिला आहे. मी नेपाळचे दुःख समजू शकतो. नेपाळच्या मदतीसाठी आम्ही बचाव तुकडी पाठवली आहे. ढिगार्‍याखाली अडकलेल्या जिवंत नागरीकांना काढण्यासाठी स्निफर श्वानही पाठवले आहेत. नेपाळचे दुःख भारतातील सव्वाशे कोटी लोकांचे दुःख आहे.” या दरम्यान त्यांनी यमनमधील मदत कार्याचाही उल्लेख केला. ते म्हणाले ” आम्ही 48 देशांच्या लोकांबा वाचवले आहे. विदेशातून भारतीयांना सुरक्षित आणण्यासाठी आम्हाला जगभरातून शुभेच्छा मिळाल्या.” या दरम्यान मोदींनी दावा केला आहे की, भारत जगातमध्ये सुख-शांती आणण्यासाठी शक्य ती मदत करण्यासाठी तयार आहे. हा देश जगाच्या शांती, सुख आणि कल्याणाबद्दल विचार करतो. नेहमी हा देश काहीना काही करत असतो. वेळ पडलीतर जीवाची बाजीही लावतो. संयुक्त राष्ट्रासाठी पीस किपींगमध्ये भारताचेच सर्वात जास्त सैन्य आहे.”