कोळसा घोटाळा, नवीन जिंदाल यांच्यासह १४ जणांविरोधात आरोपपत्र

0
11

नवी दिल्ली – अमरकोंडा मुर्गंदंगलमधील कोळसा खाणवाटप गैरव्यवहार प्रकरणी उद्योगपती नवीन जिंदाल आणि इतर १४ जणांविरोधात गुन्हे अन्वेषण विभागाने आरोपपत्र दाखल केले आहे.
माजी कोळसा मंत्री दसारी नारायण राव, माजी कोळसा सचिव एच सी गुप्ता, झारखंडचे माजी मुख्यमंत्री मधू कोडा यांच्याविरोधातही सीबीआयने आरोपपत्र दाखल केले आहे.
यासोबतच सीबीआयने दाखल केलेल्या आरोपपत्रात जिंदाल स्टील अँड पॉवर लि आणि जिंदाल रिअल्टी प्रा.लि यांच्यासह पाच कंपन्यांचाही समावेश आहे.
या सर्वांविरोधात कट रचणे,फसवणूक आणि भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यांतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
सीबीआयच्या विशेष न्यायालयात गुरुवारी या आरोपपत्रावर विचार केला जाणार आहे.