राज्यसभेचे कामकाज सहाव्यांदा तहकूब

0
4

नवी दिल्ली दि. ८ – पूर्ती सहकारी कारखाना प्रकरणात आर्थिक मार्गदर्शक तत्त्वांचे उल्लंघन झाल्याचा ठपका सरकारी लेखापाल ‘कॅग’ने केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यावर ठेवला आहे.याप्रकरणी गडकरी यांनी राजीनामा द्यावा या अशी मागणी शुक्रवारी राज्यसभेत विरोधकांनी लावून धरली. यामुळे राज्यसभेचे कामकाज वारंवार तहकूब करावे लागले.
गडकरी यांनी राजीनामा द्यावा अशी घोषणाबाजी काँग्रेस सदस्यांनी केली. त्यामुळे सुरुवातीला १० मिनिटे कामकाज तहकूब करण्यात आले त्यानंतर पुन्हा १२ वाजता राज्यसभेचे कामकाज सुरु झाले. मात्र त्यानंतरही काँग्रेसची घोषणाबाजी सुरुच राहिली आणि कामकाज पुन्हा १२.३५ पर्यंत तहकूब करण्यात आले.
विरोधकांनी गडकरींच्या राजीनाम्यावरुन गदारोळ सुरुच ठेवल्याने सहाव्यांदा राज्यसभेचे कामकाज तहकूब करण्यात आले.