केंद्रीय कृषी मंत्र्यांकडून राज्य सरकारचा पंचनामा

0
6

नवी दिल्ली दि. ८- : अवकाळी पावसाने महाराष्ट्रात किती नुकसान झालं याचा अहवालच महाराष्ट्र सरकारकडून मिळाला नसल्याचे आज केंद्रीय कृषी मंत्री राधामोहन यांनी सांगितले. राज्यसभेमध्ये अनिल देसाईंच्या लेखी प्रश्नाला त्यांनी उत्तर दिलं आहे.
अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे राज्यातील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. मात्र, राज्य सरकारकडून आपल्याला याबाबतीत अहवाल आला नसल्याचे त्यांनी लेखी उत्तर दिले. यामुळे राज्य सरकार आणि केंद्रातील मंत्र्यांमध्ये समन्वय आहे की नाही असा प्रश्न आता विचारण्यात येऊ लागला आहे.
तर काही दिवसांपूर्वीच राधमोहन सिंह यांनी अवकाळी संकटामुळे महाराष्ट्रातल्या केवळ तीनच शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याची धक्कादायक माहिती लोकसभेत दिली होती. ही माहिती महाराष्ट्र सरकारच्या अहवालानुसार दिल्याचेही त्यांनी सांगितले होते.गारपिटीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना तात्काळ मदत करण्यात येईल असं आश्वासनही राधामोहन सिंह यांनी दिलं होतं.