दाऊद पाकिस्तानातच; राजनाथ सिंह यांचा संसदेत दावा

0
9

नवी दिल्ली दि. ११ – केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी सोमवारी संसदेत म्हटले की, अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहीम पाकिस्तानातच आहे. भारत सरकार त्याला परत देशात आणणारच असा दावाही केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी संसदेत केला आहे.

राजनाथ यावेळी म्हणाले की, दाऊद 1993 बॉम्ब स्फोट प्रकरणी वाँटेड गुन्हेगार आहे. त्याच्या विरोधात रेड कॉर्नर नोटीसही जारी करण्यात आले आहे. भारताकडे तो पाकिस्तानाच असल्याची पक्की माहिती आहे. वेळो वेळी पाकिस्तानलाही याची माहिती देण्यात आली आहे. रेड कॉर्नर नोटीस काढलेली असल्याने पाकिस्तान त्याचा शोध घेण्यास बांधील आहे. तरीही पाकिस्तान या प्रकरणात कायदेशीर कारवाई करण्यास अपयशी ठरला आहे. आम्ही त्यांच्यावर दबाव कायम ठेवला आहे. यासाठी काहीही करावे लागले तरी चालेल पण आम्ही दाऊदला भारतात परत आणूच अशा शब्दांत राजनाथ यांनी आपले म्हणणे मांडले. याआधी 5 मे रोजी गृह राज्यमंत्र्यांनी दाऊद कुठे आहे, याबाबत निश्चित माहिती सरकारकडे नसल्याचे वक्तव्य केले होते. विरोधीपक्षांनी हा मुद्दा उचलून धरल्यानंतर राजनाथ सिंह यांनी हे स्पष्टीकरण दिले आहे.