गृहराज्यमंत्र्यांनी केले बिअर बारचे उद्घाटन

0
6

अहमदनगर, दि. ११ – राज्यभरात दारूबंदीसाठी चळवळ सुरू असतानाच भाजप सेनेच्या सरकारमध्ये गृहराज्यमंत्री असलेल्या राम शिंदे यांनीच जिल्ह्यात बिअर बारचे उद्घाटन केल्याने राजकीय क्षेत्रात एकच खळबळ माजली आहे. गृहराज्यमंत्री राम शिंदे यांनी शनिवारी रात्री नगरमध्ये चक्क एका बिअर बारचे उद्घाटन केले. शिंदे यांच्यासोबत अर्थ राज्यमंत्री दीपक केसरकर, आ. सुधीर तांबेंसह अनेक राजकीय नेते सोहळ्यास उपस्थित होते.भारतीय जनता पक्ष व शिवसेनेच्या मंत्र्याच्या या नव्या कार्यक्रमामूळे विरोधी पक्षाला टिकेची संधी मिळाली आहे.
जिल्ह्यात व राज्यात सध्या दारूबंदी चळवळ सुरू असतानाच गृहराज्यमंत्र्यांनीच बारचे उद्घाटन केल्यानंतर समाजासमोर कोणता आदर्श ठेवला जाईल असा सवाल विचारण्यात येत असून हे वर्तन नैतिकतेला शोभणारे नसल्याचीही चर्चा होत आहे. सत्ताधारी भाजपाच्याच मंत्र्यांने बिअर बारचे उद्घाटन केल्यावर मुख्यमंत्री आता त्यांच्यावर काय कारवाई करणार याकडेही सर्वांचे लक्ष असून विरोधकांनी मंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे.