सप्टेंबर-ऑक्टोबरदरम्यान बिहारमध्ये निवडणुका?

0
5

नवी दिल्ली-बिहार विधानसभा निवडणुका या सप्टेंबर किंवा ऑक्टोबरदरम्यान होणार, असे संकेत केंद्रीय निवडणूक आयोगाने दिले आहेत. मु्ख्य निवडणूक आयुक्त नसीम झैदी यांनी पीटीआयला ही माहिती दिली.या वर्षात सप्टेंबर अथवा ऑक्टोबरमध्ये बिहारमध्ये विधानसभा निवडणुकीची शक्यता आहे. मात्र याबाबतचे अंतिम वेळापत्रक बनवण्याचे काम सुरु असल्याचे झैदी यांनी सांगितले. कायदे मंत्रालयाकडून निवडणुकीबाबत अद्याप काही अधिकृत सुधारणा येणे बाकी आहे, असे झैदी म्हणाले.