रजत राऊत अमेरिकेच्या मिशिगन विद्यापीठाद्वारे सन्मानित

0
14

गडचिरोली,दि.१७: येथील रहिवासी रजत राऊत यांना अमेरिकेतील प्रतिष्ठित मिशिगन विद्यापीठाद्वारे नुकतेच विद्युत अभियांत्रिकी या विषयात पदव्युत्तर पदवी बहाल करुन सन्मानित करण्यात आले.
रजत राऊत हे येथील ज्येष्ठ पत्रकार, दैनिक हितवाद व पीटीआय या वृत्तसंस्थेचे प्रतिनिधी रोहिदास राऊत यांचे चिरंजीव असून, त्यांची आई अरुणा राऊत या गडचिरोली नगर परिषदे शाळेत शिक्षिका आहेत. रजत राऊत यांचे प्राथमिक शिक्षण्‍ा गडचिरोली येथील नगर परिषद शाळेत झाले. पुढे बारावीपर्यंतचे शिक्षण शिवाजी कनिष्ठ विज्ञान महाविद्यालयात घेतल्यानंतर त्यांनी मुंबई येथील फ्रान्सिस सेंट रॉड्रीग्ज इन्स्टीटयूट ऑफ टेक्नॉलॉजीमधून विद्युत अभियांत्रिकी या विषयात पदवी प्राप्त केली. त्यानंतर विविध प्रवेश परीक्षा उत्तीर्ण केल्यानंतर रजत राऊत यांची पदव्युत्तर शिक्षणासाठी अमेरिकेच्या मिशिगन विद्यापीठात निवड झाली. तेथे त्यांनी पदव्युतर शिक्षण प्राप्त केले. त्यासाठी विद्यापीठाच्या सभागृहात आयोजित खास समारंभात विद्यापीठाचे अध्यक्ष डॉ.ग्लेम डी. एमरोज यांच्या हस्ते त्यांना सन्मानित करण्यात आले. रजतचे वडील रोहिदास राऊत व आई अरुणा राऊत यांनाही अमेरिकेत आयोजित या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याची संधी मिळाली. अमेरिकेतील मिशिगन विद्यापीठ हे जगातील नामांकित १०० विद्यापीठांपैकी एक आहे, हे येथे उल्लेखनीय.