शाहरुख, इंदिरा गांधी, हिटलरचे नाव लोकसभेच्या रेकॉर्डमधून वगळली

0
11

वृत्तसंस्था
नवी दिल्ली,दि. ९ -शाहरुख खान, इंदिरा गांधी, मदर तेरेसा आणि हिटलरचे नाव लोकसभेच्या कामकाजातून विविध कारणांमुळे वगळण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सोळाव्या लोकसभेत उच्चारण्यात आलेले काही शब्द अपमानजनक, आक्षेपार्ह, असंसदीय, ऐकण्यास योग्य नसलेले आणि अनोळखी व्यक्तींच्या संदर्भातील असल्याच्या मुद्यावरून हे शब्द वगळण्यात आले आहेत.
कॉंग्रेसचे खासदार ज्योतिरादित्य शिंदे यांनी मदर तेरेसा यांच्या संदर्भातील आणि नॅशनल पीपल्स पार्टीचे खासदार पी. ए. संगमा यांनी अभिनेता शाहरुख खान याच्याविषयी केलेले वक्तव्य अनोळखी व्यक्तीच्या संदर्भातील असल्याच्या कारणावरून वगळण्यात आले आहेत. शिरोमणी अकाली दलाचे खासदार प्रेमसिंह चंदुमाजरा यांनी माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्याविषयी केलेले वक्तव्य अपमानकारक असल्याच्या कारणावरून वगळण्यात आले. जर्मनीचा हुकूमशहा ऍडॉल्फ हिटलर याच्याविषयी राष्ट्रीय जनता दलाचे खासदार राजेश रंजन यांनी केलेले वक्तव्य अपमानजनक असल्यामुळे वगळण्यात आले आहे. याशिवाय, आणखी काही महत्त्वाच्या व्यक्तींसंदर्भात केलेले उल्लेख वगळण्यात आले आहेत.