तत्काळ तिकीट रद्द केल्यास 50 टक्के रक्कम मिळणार रिफंड

0
22

नवी दिल्ली,दि.१०– रेल्वे प्रवाशांसाठी दिलासादायक वृत्त आहे. ते म्हणजे भारतीय रेल्वेने तत्काळ तिकिट बुकिंग प्रणालीत काही बदल केले आहेत. तत्काळ तिकीट रद्द केल्यास प्रवाशाला 50 टक्के रक्कम रिफंड मिळणार आहे. आतापर्यंत तत्काळ तिकीट रद्द केल्यास कोणतेही रिफंड मिळत नव्हते. याशिवाय रेल्वेने तत्काळ तिकिट बुकिंगच्या वेळेतही बदल केला आहेत.
नव्या नियमानुसार सकाळी 10 ते 11 पर्यंत एसी कोचसाठी तत्काळ तिकीट बुक करता येणार आहे, तर नॉन एसी कोचसाठी 11 ते 12 या काळात तात्काळ तिकीटांची बुकिंग करता येईल. येत्या एक जुलैपासून ही नवी प्रणाली सुरु होणार आहे.
रेल्वेच्या वतीने ‘तात्काळ विशेष रेल्वे‘ही सुरू करण्याची नवी योजना आहे. परंतु, ही ‘तात्काळ विशेष रेल्वे‘ गाडी सर्व मार्गांवर उपलब्ध होणार नाही. फक्त काही जास्त रहदारीच्या मार्गांवरच ही रेल्वे धावणार आहे. ज्यांना घाई आहे आणि लवकरच पोहचायचं आहे अशा प्रवाशांसाठी ‘तात्काळ विशेष रेल्वे‘ उपयोगी पडणार आहे. ही अतिरिक्त रेल्वे सेवा आहे. प्रिमिअम रेल्वेच्या तिकीटांची रचना मात्र कायम ठेवण्यात आली आहे.
रेल्वेने ‘तात्काळ विशेष रेल्वे‘च्या आरक्षण कालावधीतही वाढ केली आहे. आता तात्काल विशेष रेल्वेसाठी ६० दिवसांपूर्वीही आरक्षण करता येईल. तर कमीत कमी दहा दिवसांपूर्वी तात्काळ रेल्वे आरक्षण प्रवासी करू शकतील.