राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदी शरद पवार यांची फेरनिवड

0
10

वृत्तसंस्था,
पाटणा ,दि.१०- राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी शरद पवार यांची बिनविरोध फेरनिवड करण्यात आली आहे. पाटण्यात सुरू असलेल्या पक्षाच्या 6 व्या राष्ट्रीय अधिवेशनामध्ये एकमताने हा निर्णय घेण्यात आल्याचे पक्षाचे सरचिटणीस व निवडणूक अधिकारी टी. पी. टी. पी. पिथाम्बरन मास्टर यांनी जाहीर केले. 1999 मध्ये काँग्रेस पक्षातून बाहेर पडत शरद पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली होती. तेव्हापासून शरद पवार हेच पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून कार्यरत आहेत.
बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसने आपल्या पक्षाचे 6 वे राष्ट्रीय अधिवेशन बोलावण्यात आले आहे. दोन दिवसीय अधिवेशनाचा आज दुसरा आहे. आज सकाळी पाटण्यातील नॉर्थ गांधी मैदानावरील श्रीकृष्ण मेमोरियल हॉल येथे पक्षाचे अध्यक्ष पवारांचे आगमन होताच त्यांना मानवंदना देण्यात आली. त्यानंतर पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.